Indian Railways  google
बिझनेस

Indian Railways : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! पॅसेंजर ट्रेनच्या तिकिटाचे दरात मोठी कपात

Indian Railways : : भारतीय रेल्वेने प्रवासी ट्रेनच्या भाड्यात मोठी कपात करण्यात आलीय..

Bharat Jadhav

Passenger Train Ticket Fares :

पॅसेंजर ट्रेनमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वेने पॅसेंजर रेल्वेंच्या तिकीट दरात मोठी कपात करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे तिकीट दर कोरोना महामारीपूर्वीच्या पातळीवर आले आहेत. रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी घट झालीय. त्यामुळे प्रवाशांच्या तिकिटामध्ये १० ते ३० रुपयांची घट झाले आहे. यापूर्वी प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी एक्स्प्रेस ट्रेनचे भाडे द्यावे लागत होतं.(Latest News)

भारतीय रेल्वेने २७फेब्रुवारीपासून 'पॅसेंजर ट्रेन्स'चे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे पूर्ववत केले आहे. त्यांना आता 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा 'डेमू एक्सप्रेस' रेल्वे म्हणतात. दरम्यान कोविड- १९ महामारीच्या काळात प्रवासी रेल्वे गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर किमान तिकिटाची किंमत कमी करण्यात आली, असं वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने प्रासारित केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) ट्रेन आणि 'झिरो' पासून सुरू होणाऱ्या ट्रेन्ससाठी साधारण वर्गाच्या भाड्यात सुमारे ५० टक्क्यांनी कपात केलीय. अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) ॲपमधील भाडे रचना देखील त्यानुसार बदलण्यात आलीय. आधी पॅसेंजर ट्रेन म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते आणि आता त्या देशभरात 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे.

महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानकांचा होणार पुनर्विकास

अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, १५०० ओव्हर ब्रीज आणि अंडरपासचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज ROB आणि RUB असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.

देहूरोड रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

देहूरोड रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे लोणावळा लोहमार्गावरील या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजने अंतर्गत ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. या अमृत भारत स्टेशनमध्ये पुणे विभागातील दहा आणि मध्य रेल्वेच्या 36 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT