DA Hike saam tv
बिझनेस

DA Hike 2026: पेन्शनमध्ये थेट 3% वाढ! 60% वरून DR झाला 63%, तुमच्या खात्यात आता किती रुपये जमा होणार?

OPS UPS Latest News: केंद्र सरकारच्या पात्र OPS आणि UPS पेन्शनधारकांना मोठा दिलासा! महागाई सवलतीत ३ टक्के वाढ झाल्याने डीआर आता ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाईच्या वाढत्या काळात केंद्र सरकारने पात्र पेन्शनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई सवलतीत (Dearness Relief – DR) ३ टक्क्यांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ६० टक्के असलेला DR आता ६३ टक्क्यांवर पोहोचणार आहे. ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. या निर्णयाचा फायदा जुन्या पेन्शन योजनेतल्या (OPS) आणि युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) अंतर्गत येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.

महागाई सवलत म्हणजे काय?

महागाई सवलत म्हणजे पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी दिली जाणारी अतिरिक्त रक्कम. मूळ पेन्शनच्या ठराविक टक्केवारीनुसार या रकमेची गणना केली जाते. DR मध्ये ३ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे पात्र पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात वाढ होणार आहे.

OPS पेन्शनधारकांच्या कुटुंबाला किती फायदा?

जुन्या पेन्शन योजनेत (OPS) पात्र कुटुंबीयांना कर्मचाऱ्याच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या ३० टक्के दराने कुटुंब निवृ्त्तीवेतन मिळतं. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे शेवटचे मूळ वेतन ८० हजार रुपये असेल तर कुटुंबाला २४ हजार रुपये मूळ पेन्शन मिळेल.

यावर आधी ६० टक्के DR मिळत असल्याने एकूण रक्कम ३८,४०० रुपये होती. आता ६३ टक्के DR मुळे ही रक्कम ३९,१२० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ७२० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल.

UPS पेन्शनधारकांना किती पैसे मिळणार?

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) अंतर्गत पात्र कुटुंबीयांना कर्मचाऱ्याच्या मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या पेन्शनच्या ६० टक्के रक्कम कुटुंब निवृत्तीवेतन म्हणून दिली जाते. उदाहरणार्थ, कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये पेन्शन मिळत असल्यास पात्र पती किंवा पत्नीला २४ हजार रुपये मूळ कुटुंब निवृत्तीवेतन मिळेल. ६० टक्के DR नुसार ही रक्कम ३८,४०० रुपये होती. आता ६३ टक्के DR मुळे ती ३९,१२० रुपये होईल. म्हणजेच दरमहा ७२० रुपये जास्त मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत महायुतीची राजकीय खेळी; जळगावसह सोलापुरातील 6 जागा बिनविरोध

कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीटंचाईचं संकट! उल्हास नदीची पातळी घटली, MIDC चाही ठेंगा

Main Entrance Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाचा फोटो लावावा की नाही, जाणून घ्या 5 महत्वाचे नियम

Kitchen Cleaning : किचनचा घाणेरडा कपडा कितीही स्वच्छ केला तरीही वास जात नाही, अशावेळी काय कराल?

SCROLL FOR NEXT