Gold Rate google
बिझनेस

Gold Rate: सोन्याच्या दरात 3,666 रुपयांनी वाढ; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold Sliver Price India : आठवडाभरात सोन्याच्या दरात ३,६६६ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि दिल्लीत दर १.५० लाखांवर पोहोचले असून चांदीचे दरही वाढले आहेत.

Sakshi Sunil Jadhav

एप्रिल-मे महिना हा लग्नाच्या धामधुमीचा काळ मानला जातो. लग्नाच्या या दिवसांमध्ये सोनं-चांदी खरेदी केली जाते. मग इथे सर्वसामान्यांपासून ते उच्च वर्गीयांपर्यंत सगळेच लोक खरेदी करतात. पण आता वाढत्या सोन्याच्या दरांमुळे अनेकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. कारण पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ 3666 रुपयांनी झाली आहे. पुढील माहितीत आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

मागील महिन्याचा म्हणजेच मार्च महिन्यात सोन्याचा दर हा तब्बल १२ हजारांनी कमी झाला होता. पण यामहिन्यात हा दर पुन्हा वाढेल अशी दाट शक्यता आहे. फक्त एका आठवड्यात 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 3,666 रुपयांची वाढ झालेली आहे.

आजचा सोन्याचा दर किती?

10 ग्रॅम सोनं 1.47 लाखांवर गेलेलं आहे. या आठवड्यात 3,666 रुपयांची यामध्ये वाढ झालेली आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,51,080 रुपये आहे. तर मुंबईत सोन्याची किंमत 1,50,930 रुपये इतकी आहे.

चांदीचा आजचा दर किती?

सोन्यासोबत चांदीचे दर सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहेत. लग्नासमारंभात फक्त सोनं नाही तर चांदीचीही विकत घेतली जाते. पण आता चांदीच्या किंमतीतही मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. चांदीचे दर हे 5,000 रुपयांनी महाग झाली आहे. हे दर 2.50 लाख रुपये प्रति किलो ग्राम इतके आहेत.

सोन्याचे आठवड्याभरातील दर

सरकारच्या निर्णयामुळे येणाऱ्या काळात दर वाढण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांमध्ये यात मोठे बदल होताना पाहायला मिळाले. जसं की, 27 मार्च 2026 रोजी सोन्याचा दर जवळपास 1.43 लाख रुपयांनी प्रति 10 ग्रॅम होता. पुढे हा दर 5 एप्रिल 2026 पर्यंत 1.47 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. दिल्लीमध्ये हा दर ₹1,51,080 रुपये इतका आहे. तर मुंबईत ₹1,50,930 रुपये इतका आहे. म्हणजेच आठवडाभरात 24 कॅरेट सोन्याचा दर 2,860 लाख रुपयांनी महाग झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 2,600 रुपयांनी वाढलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT