Gold and Silver Prices Drop Sharply Ahead of Wedding Season in India google
बिझनेस

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Silver Price Today: मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. लग्नसराईत खरेदीदारांसाठी ही आनंदाची बातमी असून गुंतवणुकीसाठीही योग्य संधी निर्माण झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

मार्च महिन्यात सोनं स्वस्त

लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी मोठा दिलासा

जागतिक घडामोडी, डॉलर मजबूत होणे हे मुख्य कारण

सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसात सोनं-चांदीचा खप सगळ्यात जास्त होत असतो. पण महिनाभरात यामध्ये बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीचे जर गगनाला भिडताना पाहायला पाहायला मिळाले होते. आता परिस्थिती थोडी बदलली आहे. कारण गेल्या काही दिवसात सोनं-चांदीचे दर कमी होताना पाहायला मिळाले आहे. ही सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि खिशाला परवडणारी बातमी आहे.

लग्नाच्या धामधुमीत सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीही उत्साहात पाहायला मिळत आहेत. पुढील माहितीत आपण महिनाभरात सोनं आणि चांदीच्या किंमतीत काय बदल झाले याबद्दल जाणून घेणार आहोत.

सोन्याच्या किंमतीत किती घसरण झाली?

सोने-चांदीच्या मार्च महिन्याच्या किंमतीत घसरण होताना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूकदरांचे लक्ष या मौल्यवान धातूंवर केंद्रित झाले आहे. कारण ४ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर हा सुमारे ₹1.62 लाख प्रति 10 ग्रॅम होता. हाच दर आता घसरून ₹1.50 लाखांच्या आसपास आला आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात सुमारे ₹12 हजारांची घट झाली आहे.

चांदीच्या किंमतीत किती घसरण झाली?

चांदीही लग्नसराईत जास्त खरेदी केली जाते. चांदीचा दर हे ४ मार्चला ₹2.70 लाख प्रति किलो होता. आता यात काही प्रमाणात बदल झाला आहे. आता तो दर ₹2.35 लाखांपर्यंत खाली आला आहे. म्हणजेच चांदीत तब्बल ₹35 हजारांची घसरण झालेली आहे. ही सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सोनं- चांदीच्या किंमतीत का झाली घसरण?

तज्ज्ञांच्या मते, यामागील मुख्य कारण असं आहे की, मिडल ईस्टमधील वाढता तणाव आणि अमेरिका-इराणमधील भविष्यातील परिणामाबद्दल निश्चितता. दुसरं कारण म्हणजे बाजारातील अस्थिरता वाढल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली (Profit Booking) सुरू केली. तिसरं कारण म्हणजे जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने-चांदीवर दबाव आला. मात्र सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ आहे. पण बाजार अजूनही जागतिक घडामोडींवर अवलंबून असल्याने सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

SCROLL FOR NEXT