Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Silver Rate : मकर संक्रांतीला सोन्यावर 'संक्रांत'; भाव घसरला, ग्राहकांसाठी 'गोड गोड तोळा'

Todays Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात ५०० रुपयांची घसरण झाली. सोनं ८० हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. गेल्या दोन आठवड्यापासून चांदीच्या भावातील घसरगुंडी चालूच आहे.

Bharat Jadhav

मकर संक्रांतीच्या दिवशी सराफ बाजारात सोन्याची चकाकी काहीशी उडाली असल्याचं दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्याचे दर कमी होते, आज सणाच्या दिवशी सोन्याचे दरात वधारतील अशी शक्यता होती, मात्र सोन्याचे दर चक्क ५०० रुपायांनी घसरलेत. आज जळगावमधील सराफ बाजारात सोन्याचा रंग काहीसा उडालेला दिसला. प्रति तोळ्याच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाल्याच पाहायला मिळालं. सोन्यासह चांदीच्या दरही घसरल्याचं दिसले.

सोने खरेदीसाठी अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशी आणि मकर संक्रांती हे उत्तम मुहूर्त आहेत. या मुर्हूताच्या दिवशी सोन्याचे दर कमी झालेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. मात्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली होती. आजही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात मंगळवारी एकाच दिवसात ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोनं जीएसटीसह ८० हजार ५०० प्रति तोळे आहे. तर चांदीच्या भावातदेखील आठवडेभरात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. GST सह चांदीचे दर आता प्रति किलो ९२ हजार ५०० रुपये आहे. गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीचे भाव सतत वाढ होत होती. मात्र मंगळवारी सोन्याच्या भावात ५०० रुपयांची तर चांदीत दोन हजार रुपयांची घसरण झाली.

सोने आणि चांदीच्या दरात का घसरण होण्यामागे महागाई आहे. जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने सोन्याची मागणी वाढलीय. तर शेअर मार्केटमध्ये डाऊन टू रेट चालू असल्याने सोने- चांदीच्या दरावर परिणाम झालाय. सोन्याच्या दरातील घसरण आजच झालीय. तर चांदीच्या दरातील घसरण दोन हजार रुपयाने झाल्याची प्रतिक्रिया सोने व्यापारी सागर भंगोळे यांनी दिलीय.

महाराष्ट्रातील इतर शहारत आज कसे होते दर?

आज सकाळी मुंबईच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ७,३३० प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ७,९९६ प्रति ग्रॅम होतं. मुंबईतच नाही तर देशभरातील लोकांमध्ये सोने खरेदी करण्याची इच्छा वाढतेय. काही वेळा मुंबईत सोन्याचे भाव इतर शहरांपेक्षा कमी असतात. तर पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ७,३३० प्रति ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ७,९९६ प्रति ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत ९२.५० प्रति ग्राम आणि किलोग्रामसाठी ९२,५०० रुपये होती. पुण्यासह मुंबईतील बाजारातही हेच दर पाहायला मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT