Gold Silver Rate (9th February 2024), Gold Silver Price, Gold rate  Saam Tv
बिझनेस

Gold Silver Rate (9th February 2024): सोन्याचा भाव गडगडला, चांदीच्या दरात उसळी, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचा भाव

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (9th February 2024):

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली. लग्नसराईचा काळ सुरु झाल्यामुळे सोन्याचे भाव घसरले आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे.

अर्थसंकल्पात सोन्या-चांदीच्या आयाती शुल्कावर १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करताना जास्तीचे पैसेही मोजावे लागणार आहे.

देशातंर्गत बाजारात सोन्याच्या (Gold) दरात वाढ होताना दिसून येत आहे. अमेरिकन बाजारात सोन्याचे भाव अस्थिर झालेले पाहायला मिळाले आहे. यूएस मध्यवर्ती बँकर्सच्या दर कपातीमुळे डॉलर आणि ट्रेझरी उत्पन्न अधिक मजबूत झाल्यामुळे आज सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,८०५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात १०० रुपयांनी (Price)घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,३१० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी २०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.

आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,००० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)

  • मुंबई- ६३,१६० रुपये

  • पुणे - ६३,१६० रुपये

  • नागपूर - ६३,१६० रुपये

  • नाशिक - ६३,१९० रुपये

  • ठाणे - ६३,१६० रुपये

  • अमरावती - ६३,१६० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli: एक-दोन नाही तर २०२४ मध्ये इतक्या वेळा शून्यावर बाद झालाय विराट!

Personality Development: अधिक आत्मविश्वास आणि आकर्षक होण्यासाठी 7 मार्ग

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT