Jalgaon Gold Silver Today Rate Saam Tv
बिझनेस

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Jalgaon Today Gold Rate News : जळगावातील सुवर्ण बाजारात सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असून लग्नसराईच्या काळात ग्राहक संभ्रमात आहेत. वाढत्या किमतींमुळे खरेदीवर परिणाम होत आहे. वाचा आजचा सोन चांदीचा भाव काय?

Alisha Khedekar

  • जळगावात सोन्याचा दर १.४६ लाखांवर

  • चांदीच्या दरात किंचित घसरण

  • बाजारात दरात सतत चढ-उतार

  • ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये खरेदीसाठी संभ्रम

Jalgaon Gold Silver Today Rate शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अनेक दिवसांपासून सोनं, चांदीच्या दरात मोठी चढ-उतार होत असून, लग्नसराई तसेच सणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेले ग्राहक संभ्रमात पडले आहेत. सोनं आणि चांदीचे दर जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्याची चिन्हे नसल्याने सुवर्ण व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज जळगावच्या बाजारात सोन्याचे दर १,४६,५०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. तर चांदीचे दर हे २, ३१,००० रुपयांवर जाऊन पोचले आहेत.

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सोन चांदीवर झालेला पाहायला मिळतो आहे. शनिवार च्या तुलनेत जळगावमधील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी सोने आणि चांदीच्या किमती किंचित बदल झाला असून बऱ्यापैकी स्थिर राहिलं आहे. सलग वाढीनंतर आलेली ही स्थिरता बाजारासाठी दिलासादायक ठरली जात असून, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल म्हणजेच रविवारी २९ मार्च रोजी सोन्याचे दर १,४६,००० होते, आणि चांदीचे दर २,३३,००० इतके होते. तर आज म्हणजेच सोमवारी ३० मार्च रोजी सोन्याचे दर १,४६,५०० इतके आहे, तर चांदीचे दर २,३३,००० इतके आहे. म्हणजेच रविवारच्या तुलनेने चांदी आज २ हजारांनी घसरली आणि सोन फक्त ५०० रुपयांनी वाढलेलं पाहायला मिळत आहे.

लग्नसराईच्या दिवसांमध्ये सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळायची. मात्र, यंदा वाढत्या किमतींमुळे बाजारपेठेत तुलनेने गर्दी पाहायला मिळते आहे. सोने-चांदीचे दर आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली असून, खरेदी-विक्रीचे व्यवहार मर्यादित प्रमाणात होत असल्याचेही चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : ठाण्यात एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विश्वासू उमेदवाराला मैदानात उतरवले

Vasai-Virar Tourism : रिमझिम पावसात समुद्रकिनारी चिंब भिजा, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात वसईत लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT