Gold Silver Price Today saam tv
बिझनेस

Gold- Silver Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० तोळे १७,४०० रुपयांनी स्वस्त; वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Gold-Silver Price Drop: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

Priya More

Summary -

  • आज सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४ कॅरेटचा १ तोळे सोन्याच्या दरात १,७४० रुपयांची घट झाली

  • २४ कॅरेटच्या १० तोळे सोन्याचे दर १७,४०० रुपयांनी कमी झाले

  • चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे

सोनं-चांदीच्या दरामध्ये आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आज सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोनं-चांदीच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७४० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ५ रुपयांनी घसरण झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,७४० रुपयांनी कमी झाले आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२३,६६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १७,४०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,३६,६०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना आजही सोनं खरेदीची सुवर्णसंधी आहे.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,६०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१३,३५० रुपये मोजावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १६,००० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,३३,५०० रुपये खर्च करावे लागतील. काल हेच सोनं ११,४९,५०० रुपयांना विकले गेले.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात देखील १,३१० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,७४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १३,१०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,२७,४०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे आज हे सोनं खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार नाही.

दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचे दर ५ रुपयांनी घसरले आहेत. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १६२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ५,००० रुपयांनी घसरण झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,६२,००० रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची देखील सुवर्णसंधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Milk: थंडीत १ ग्लास दुधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा, या डोकेदुखी आजारावर घरीच मिळेल आराम

Case Against Actor: रेप केसमध्ये अडकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल, यावेळी कोणते नविन आरोप

Team India: गंभीर-गिलमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मतभेदांचं कारण चर्चेत

Pune Winter Tourism: हिवाळ्यात फिरायला कुठे जाल? पुण्याजवळ आहेत 8 Hidden सुंदर पिकनिक स्पॉट्स, जाणून घ्या

रूग्णवाहिकेनं मध्यरात्री घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू, घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT