Gold Silver Price Today 18 July 2023 Saam TV
बिझनेस

Gold Silver Price Today: अधिकमास सुरू होताच सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव मात्र वाढला; जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price Today 18 July 2023: स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अधिकमास सुरू होताच सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.

Satish Daud

Gold Silver Price Today 18 July 2023: दर्श अमावस्या संपली असून आजपासून अधिकमास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सासरच्या मंडळींकडून जावयाला सोन्या-चांदीच्या वस्तू देण्याची प्रथा आहे.

त्यामुळे या महिन्यात सोने खरेदीचे प्रमाण वाढते. अशातच स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. अधिकमास सुरू होताच सोने-चांदी (Gold Silver Price) दरात घसरण झाली आहे.

मंगळवारी सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर (Gold Price) झपाट्याने खाली आले आहेत. गुड रिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात प्रतितोळा १२० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजार १०० इतके झाले आहेत.

याशिवाय २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही १२० रुपयांची घसरण झाली असून २२ कॅरेटचे दर ५५ हजार १०० इतके झाले आहेत. दरम्यान, सोन्याचे दर कमी झाले असले, तरी चांदीच्या दरात (Silver Price) मात्र वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी सराफा बाजार उघडताच चांदीचा भाव झपाट्याने वाढला.

१ किलो चांदीच्या दरात तब्बल ३०० रुपयांची वाढ झाली असून सराफा बाजारात चांदी प्रतिकिलो ७८ हजार ८०० रुपयांनी विकली जात आहे. धोंड्याच्या महिन्यात सोने-चांदी खरेदीला नागरिक पसंत देत असल्याने महिनाभरात सोन्याचे भाव गगनाला भिडू शकतात, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सोने-चांदी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत स्लीपर ट्रेन आहे खूपच जबरदस्त, रेल्वेकडून संपूर्ण प्लान तयार, प्रवाशांना नेमक्या काय सुविधा मिळणार?

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

अमेरिकेत सर्वात मोठा घोटाळा, भारतीय वंशाच्या व्यक्तीवर ४००० कोटींच्या लोन फ्रॉडचा आरोप

WhatsAppवर Online न राहता करु शकता चॅटींग, वाचा ट्रिक्स

Jio VS Airtel: ३५९९ रुपयांचा प्लॅनमध्ये कोण देतं जास्त डेटा आणि फायदे, जाणून घ्या बेस्ट प्लॅन कोणता?

SCROLL FOR NEXT