28th March 2024 Today's Gold Silver Rate In Maharashtra in Marathi
28th March 2024 Today's Gold Silver Rate In Maharashtra in Marathi Saam tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला, चांदीच्या भावात उसळी; जाणून घ्या आजचे दर

कोमल दामुद्रे

24k Gold Silver Rate In Maharashtra:

मार्च महिन्यात सोन्या-चांदीचे दरात उसळी पाहायला मिळाली. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या भावात तेज पाहायला मिळाल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

मार्च महिन्यात पहिले १० दिवस धातुंच्या किंमतीत वाढ झाली. २१ मार्चनंतर सोन्याच्या भावात चढ-उतार पाहायला मिळाला आहे. होळीनंतर सोन्याचे भाव स्थिर होते. परंतु काल पुन्हा एकदा भावात उसळी पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यात सोने १५०० रुपयांनी तर चांदी २८०० रुपयांनी महागली होती.

जगभरातील केंद्रीय बँकांनी सोने खरेदीचा जोरदार सपाटा लावला आहे.लवकरच सोन्याच्या भाव ७० हजारांच्या आकड्यांपर्यंत पोहोचू शकते. जाणून घेऊया महाराष्ट्रासह राज्यातील आजचे नवे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,१८५ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६७,४६० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात ३८० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७७,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात ३०० रुपयांनी घसरण झाली आहे.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६७,३१० रुपये

  • पुणे - ६७,३१० रुपये

  • नागपूर - ६७,३१० रुपये

  • नाशिक - ६७,३४० रुपये

  • ठाणे - ६७,३१० रुपये

  • अमरावती - ६७,३१० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Interview : लोकशाही, आरक्षण, भ्रष्टाचार; लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाकरे वादळ धडकणार

Pankja Munde News : महाराष्ट्रातील कोणतीही चर्चा थांबवायची असेल तर पंकजा मुंडेंची बातमी करा! पंकजा मुंडे असं का बोलल्या?

Sanjay Raut News : संजय राऊतांना ते वक्तव्य भोवणार? राऊतांविरोधात तक्रार दाखलं

Pune Rain News Today: पुणे शहरात मुसळधार! नांदेड सिटी रोडवर पाणीच पाणी, वाहतूक मंदावली

Nashik Loksabha: महायुतीत वादाची ठिणगी! सुहास कांदे अन् छगन भुजबळांमध्ये जोरदार घमासान; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT