Today's Gold Silver Rate, (24th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: ऐन लग्नसराईत ग्राहकांना झटका! सोन्याचा भाव ६३ हजारांवर, चांदीच्या किंमतीतही वाढ; जाणून घ्या आजचा भाव

(24th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. या काळात खरेदीदारांचा अधिक कल हा धातूंवर असतो.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (24th February 2024):

लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. या काळात खरेदीदारांचा अधिक कल हा धातूंवर असतो. सराफ बाजारातील अनेक व्यापारी हे गुंतवणूकीसाठी सोन्याचा पर्याय निवडतात.

आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायाला मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना झटका मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल होताना दिसून आला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती वाढीसह उघडल्या, तर चांदीच्या फ्युचर्सच्या किमती आधीच्या बंद भावाने सुरू झाल्या. कॉमेक्सवर सोने प्रति औंस $2,034.10 वर उघडले. तर मागच्या किंमत $2,030.70 होत्या. Comex वर चांदीचे वायदे $22.78 वर उघडले, मागील बंद किंमत $22.78 होत्या. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७८५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६३,१०० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात २२० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,९०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ४०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,९५० रुपये

  • पुणे - ६२,९५० रुपये

  • नागपूर - ६२,९५० रुपये

  • नाशिक - ६२,९८० रुपये

  • ठाणे - ६२,९५० रुपये

  • अमरावती - ६२,९५० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT