Today's Gold Silver Rate, (13th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate : सोन्याच्या भावात वाढ, चांदीच्या किमतीत किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर

(13th March 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: मार्च महिन्यात सोन्याच्या भावात नवा विक्रम केलेला पाहायला मिळाला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (13th March 2024):

लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होईल. अशातच पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांकाची पातळी ओलांडली होती अशातच मार्च महिन्यात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावाने नवा विक्रम केला आहे.

मार्च महिन्यात मागच्या ११ दिवसांपासून सोनं तब्बल ३ हजारांपेक्षा जास्त रुपयांनी महागले आहे. १ मार्चपासून ते ७ मार्चपर्यंत सोन्याच्या भाव ६५ हजार रुपयांवर पोहोचला. अशातच लवकरच सोन्याचा भाव ७० हजारांपर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२०२३ च्या सुरुवातीपासून ते वर्षाअखेरीस सोन्याच्या भावात १६ टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. २०२४ मध्ये जगभरात आर्थिक मंदीचे संकेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील सोन्याचा आजचा दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०५० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात ३९० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,९९० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ४२० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,२०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ९०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६५,८४० रुपये

  • पुणे - ६५,८४० रुपये

  • नागपूर - ६५,८४० रुपये

  • नाशिक - ६५,८७० रुपये

  • ठाणे - ६५,८४० रुपये

  • अमरावती - ६५,८४० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील विषारी दारू प्रकरणी 9 दारु विक्रेत्यांवर CID ने केली मोक्का अंतर्गत कारवाई

Mumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, ३-४ किलोमीटरच्या रांगा

Khandeshwar Tourism : 'खांदेश्वर'जवळील 'ही' सुंदर पर्यटन स्थळे एकदा फिरा, पावसाळ्यात निसर्गाच्या प्रेमात पडाल

Snake Bite: सापाने दंश केल्यानंतर काय करावं?

राहुल गांधींकडून कार्यकर्त्यांचा विश्वासघात; काँग्रेसच्या महिला नेत्याचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT