Gold Silver Price Today (24th October) Saam tv
बिझनेस

Gold Silver Price Today (24th October): दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, सोनं खरेदीसाठी जाण्याआधी चेक करा लेटेस्ट दर

Today's (24th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबई-पुण्यात सोन्याचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (24th October):

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा सण दसरा. राज्यात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सोनं मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याला अधिक महत्त्व आहे. या दिवशी सोन्या सोबतच अनेक लोक सोन्याचं आपट्याचं पान खरेदी करतात. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला अर्थात काल सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काल सोनं २०० रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदीच्या भावात ५०० रुपयांनी (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली. पितृपक्षाच्या पंधरवड्यात सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळाली. परंतु, त्यानंतर इस्त्राइल हमास युद्धामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीवर दिसून आला आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली. आज दसऱ्यानिमित्त सोन्याच्या बाजारात खरेदीदारांची मंदीयाळी पाहायला मिळत आहे. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झालेली पाहायला मिळाली.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६७० रुपये मोजावे लागणार आहे तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६१,८४० रुपये मोजावे लागणार आहे. अशातच आज सोन्याच्या भावात २४० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. चांदीचा भाव किंचित घसरला आहे. आज १० ग्रॅम चांदीसाठी (Silver) ७४६ रुपये मोजावे लागणार आहे.

1. मुंबई-पुण्यात सोन्याचा भाव किती?

मुंबई-पुणे आणि नागपूरमध्ये आज २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,६९० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव ६१,७२० रुपये मोजावे लागणार आहे. ठाण्यातही भाव मुंबई (Mumbai)-पुण्यासारखाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT