Gold Silver Price Today (28th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (28th October): दिवाळीपूर्वीच सोनं ६२ हजारांवर, चांदीची चकाकी उतरली; तुमच्या शहरातील आजचा भाव किती?

Today's (28th October 2023) Gold Silver Rate In Maharashtra : दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (28th October):

दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला धातूंच्या किमतीत घसरण झाली होती. परंतु, दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सणासुदीच्या काळात ग्राहकांचा कल हा सोने खरेदीवर अधिक प्रमाणात असतो. परंतु, या काळात सोन्याचे भाव वाढल्याने सराफ बाजारात सोन खरेदीसाठी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या दोन महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. अखाती देशातील युद्धाचा परिणाम धातूवर दिसून आला. आज सोन्याचा भाव ६२ हजारांवर पोहोचला आहे. हा दर दसऱ्यांपूर्वीच वाढल्यामुळे दिवाळीत (Diwali) आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मागील पंधरा दिवसात सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच मागच्या १० दिवसांमध्ये सोन्याच्या भावात तब्बल ३००० रुपयांनी (Price) वाढ झाली. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६२,७७० रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या भावात ६६० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली. आज १ किलो चांदीसाठी ७४,६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरात मुंबई (Mumbai)-पुणे आणि नागपूरमध्ये आज २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव हा ६२,६२० रुपये आहे तर ठाण्यातही हाच भाव पाहायला मिळाला आहे. नाशिक सारख्या शहरात २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,६५० रुपये मोजावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT