24k Gold Silver Rate (20th February 2024) in Marathi Saam Tv
बिझनेस

Today's Gold Silver Rate: सोन्याच्या भावात किंचित घसरण, चांदीची चकाकी नरमली; जाणून घ्या आजचा भाव

(20th February 2024) Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल होताना दिसत आहे. सोन्या आणि चांदीच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (20th February 2024):

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठा बदल होताना दिसत आहे. मागच्या दहा दिवसात सोन्याच्या दरात ११६० रुपयांनी घसरण झाली आहे. अशातच १४ फेब्रुवारीला एका दिवसात सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली.

मागच्या दोन ते तीन दिवसात सोन्याच्या भावात पुन्हा ३३० रुपयांनी वाढ झाली. आज सोन्या आणि चांदीच्या भावात किंचित घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी देखील चांगली संधी आहे.

जागतिक बाजारात कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड US $ 2003 प्रति औंसवर व्यापार करत आहे. जो मागच्या काही तुलनेत US $ 10 ने जास्त आहे.चांदीच्या भावात देखील US $ 22.97 प्रति औंस वर वाढला होता तर मागच्या काही तुलनेत US $ 22.50 प्रति औंसवर बंद झाला होता. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव.

आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५० रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात १०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ११० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीत (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार ५०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24K Gold Rate Today)

  • मुंबई- ६२,५६० रुपये

  • पुणे - ६२,५६० रुपये

  • नागपूर - ६२,५६० रुपये

  • नाशिक - ६२,५९० रुपये

  • ठाणे - ६२,५६० रुपये

  • अमरावती - ६२,५६० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT