Gold Silver Price Today (6th October)
Gold Silver Price Today (6th October) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (6th October) : सोन्याच्या भावात २००० रुपयांनी घसरण, तुमचा शहरात आजचा भाव किती?

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Gold Silver Rate In Maharashtra (6th October):

पितृपक्ष सुरु झाला की, जळगावच्या सुवर्ण नगरीत सोनं खरेदीसाठी शुकशुकाट पाहायला मिळतो. मागच्या काही काळापासून सोन्याचे दर हे ६० हजार पार गेले होते. मात्र मागच्या १० दिवसात सोन्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे खरेदीदारांची झुंबड येथे पाहायला मिळाली.

जळगावाच्या बाजारात सोन्याचे भाव २००० रुपयांनी कमी झाल्यामुळे ग्राहकांनी गर्दी केली आहे. आंतरराष्ट्रीय बँकाचे व्याजदर जास्त झाल्यामुळे आणि डॉलरचा भाव वधारल्यामुळे सोन्याच्या भावात घट झालेली पाहायला मिळाली. पितृपक्षात सोन्याचे दर गडगडल्यामुळे खरेदीदारांची मंदियाळी पाहायला मिळत आहे.

जळगावात (Jalgaon) आज सोन्याचा भाव ५७ हजार ३०० रुपये आहे. त्यात सोन्याचे भाव २००० रुपयांनी घसरले आहेत. नवरात्री, दसरा आणि दिवाळी असल्यामुळे सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होऊ शकते. अशावेळी सुरक्षित गुंतवणूकीसाठी ग्राहकांनी जळगावाच्या बाजारात सोने खरेदीला अधिक पसंती दिली. याबाबतची माहिती तेथील सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी दिली. महाराष्ट्रातील इतर जिल्हयात आजचा सोन्याचा (Gold) भाव किती यावर नजर टाकूया.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्नुसार आज २२ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५२,६५० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ५७, ३८० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीसाठी (Sliver) प्रति किलो ७०,६०० रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबई-पुण्यात आजचा दर किती?

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याच्या भावासाठी ५७,२३० रुपये तर पुण्यातही भाव सारखेच आहे. नाशिकमध्ये आज सोन्याचा भाव हा २४ कॅरेटसाठी ५२,५३० रुपये मोजावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

Monsoon 2024 News: मान्सूनचे ‘या’ दिवशी होणार केरळात आगमन; महाराष्ट्रात मोसमी पाऊस कधी येणार?

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, या राशींची आर्थिक स्थिती होणार मजबूत; दैनंदिन कामात मिळणार यश

Horoscope 16 May : कुंभसह ४ राशींच्या लोकांसाठी गुरुवार ठरणार लकी

Federation Cup: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राचा धमाका, फेडरेशन कपमध्ये जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT