Gold Silver Price Today (1st November) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price Today (1st November): खरेदीदारांना दिलासा! सोनं १२०० रुपयांनी स्वस्त, तुमच्या शहरातील आजचा भाव किती?

Today's (1st November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : सणासुदीच्या काळात धातूच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (1st November):

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात धातूच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. मागच्या महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती.

दसऱ्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला होता. आखाती देशातील युद्धाची झळ भारतासह इतर अनेक देशांना सोसावी लागत आहे. अशातच दिवाळी सोनं महागणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली परंतु, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव गडगडला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागच्या महिन्यात पितृपक्षाच्या पंधरवड्यात सोन्याचा भाव ५७ हजारांवर आला होता परंतु, इस्त्राइल- हमास युद्धामुळे सोन्याच्या भावात वाढ झाली. त्यामुळे सराफ बाजारात खरेदीदारांची वर्दळ कमी पाहायला मिळाली. अशातच दिवाळीपूर्वी (Diwali) पुन्हा सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागच्या आठवड्याभराच्या तुलनेत आज सोन्याचा भाव १२०० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. २८ ऑक्टोबरला प्रति तोळ्यासाठी सोन्याचा (Gold) भाव हा ६२,७७० रुपये इतका होता. चांदीच्या दरातही किंचित घट झालेली पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,६५५ रुपये मोजावे लागणार आहेत तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६१,६८० रुपये मोजावे लागणार आहे. आज २४ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात मागील दरानुसार ३२० रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. तर चांदीच्या (Silver) किमतीही घसरल्या आहेत. आज १ किलो चांदीसाठी ७४,१०० रुपये (Price) मोजावे लागणार आहेत.

1. मुंबई- पुण्यात सोन्याचा भाव किती?

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार मुंबई (Mumbai)-पुणे-नागपूर आणि ठाण्यात २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,५३० रुपये मोजावे लागणार आहे. तर नाशिकमध्ये आज २४ कॅरेट सोन्यासाठी ६१,५६० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT