Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Rate Today Hike Before Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशी आज सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर वाढले

अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याच्या दरात वाढ

वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या आदल्या दिवशीच सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. अचानक सोन्याच्या दरात वाढ झाल्याने आता उद्या सोनं खरेदी करायचं की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मूहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु सध्या सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे दीड लाखांपेक्षा जास्त आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे उद्या खरेदीदार सोने खरेदीकडे पाठ फिरवू शकतात. दरम्यान, आजचे सोन्याचे दर वाचा.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24K Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,५५,७८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ६४८ रुपयांची वाढ होऊन हे दर १,२४,६२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८,१०० रुपयांनी महागले असून १५,५७,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ७५० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,४२,८०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ६०० रुपयांनी वाढून १,१४,२४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ७,५०० रुपयांनी वाढले असून हे दर १४,२८,००० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ६१० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,१६,८४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ४८८ रुपयांनी वाढले असून ९३,४७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं ६,१०० रुपयांनी महागलं असून हे दर ११,६८,४०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT