Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; आजचे २२ अन् २४ कॅरेटचे दर काय? वाचा सविस्तर

Gold Rate Hike Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर जवळपास १ लाखांच्या जवळ गेले आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर जवळपास १ लाख रुपये झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे परवडत नाही. त्यात अनेकजण सणासुदीला सोने खरेदी करतात. आता सोन्याचे दर वाढल्याने अनेकांनी सोने खरेदी करण्यासाठी पाठ फिरवली आहेत. त्यातच आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत.

सोन्याचे दर वाढले (Gold Rate Hike Today)

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ९९,८८० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७९,९०४ रुपये आहेत. या दरात १३६ रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, १० तोळा सोन्याच्या दरात १७०० रुपयांनी वाढ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज ८ ग्रॅम सोन्याचे दर ७३,२४० रुपये झाले आहेत. या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ९१,५५० रुपये झाले आहेत. या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे तर १०० ग्रॅम सोन्याचे दर १५०० रुपयांनी वाढले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ७४,९१० रुपये आहेत. या दरात १२० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,९२८ रुपये आहेत.

चांदीचे दर (Silver Rate)

आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दर जैसे थे वैसे आहेत.८ ग्रॅम चांदीचे दर ९२० रुपये आहेत. १० ग्रॅम चांदीचे दर १,१५० रुपये आहेत. १०० ग्रॅम चांदीचे दर ११,५०० रुपये आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT