Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: पहिल्या श्रावण सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा 18 -22 आणि 24 कॅरेटचे दर

Gold- Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला आज कात्री लागणार आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. वाचा आजचे दर किती...

Priya More
  • सोन्याच्या दरातआज मोठी वाढ

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५३० रुपयांनी वाढ

  • आज चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

  • १ किलो चांदी २.५० लाख रुपयांना विकली जात आहे

सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू आहे. आज श्रावणातील पहिल्या सोमवारी सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५३० रुपयांनी वाढ झाली. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहे ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १ तोळा सोन्याचे दर ५३० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला१,५५,६६० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १५,५६,३०० रुपयांना विकले जात आहे.

आज २२ कॅरेट सोन्याचे दर देखील वाढले आहेत. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४२,७०० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १४,२७,००० रुपये मोजावे लागतील.

तर आज २४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ४१० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी १,१६,७६० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ४१०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ११,६७,६०० रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. १ किलो चांदी २,५०,००० रुपयांना विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT