सोनं-चांदीच्या दरात गेल्या आठवड्यात दररोज घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. पण या आठवड्याची सुरूवात होताच सोन्याचे दर वाढायला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर पुन्हा वाढू लागल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १२४० रुपयांनी वाढले. तर आज चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लान करत असला तर एकदा आजचे १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर किती आहेत? हे घ्या जाणून...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १२४० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२७,८०० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १२,४०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,७८,८०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ११५० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१७,१५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ११,५०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,७१,५०० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज महाग झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ९४० रुपयांनी वाढले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९५,८५० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ९,४०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,५८,५०० रुपये खर्च करावे लागतील.
आज सोन्याचे दर वाढले मात्र चांदीचे दर स्थिर आहेत. आज १ ग्रॅम चांदीचा १७५ रुपये आहे. तर १ किलो चांदी चांदी खरेदीसाठी आज १,७५,००० रुपये खर्च करावे लागतील. लग्नसराई असल्यामुळे ग्रहाकांचा सोनं-चांदी खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. पण आता सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.