सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. आज देखील सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं-चांदी स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात २५७० रुपयांची घसरण झाली. तर १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर किती ते जाणून घ्या...
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २५७० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,३०,६९० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २५,७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १३,०६,९०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,३५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१९,८०० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २३,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,९८,००० रुपये मोजावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं १,९२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९८,०२० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १९,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,८०,२०० रुपये खर्च करावे लागतील.
आज सोन्यासोबत चांदी देखील खरेदी करण्याची चांगली संधी आहे. चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली. या चांदीचा आजचा दर १८० रुपये आहे. तर १ किलो चांदी ५००० रुपयांनी स्वस्त झाली. ही चांदी खरेदीसाठी १,८०,००० रुपये खर्च करावे लागतील. आज तुम्हाला सोन्यासोबत चांदीचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्रहाकांचा सोनं-चांदी खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. दर कमी झाल्यामुळे आज तुम्ही सोन्यात गुंतवणूक देखील करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.