दिवाळीचा सण जवळ आल्याने बाजारात सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचे अनेकांचे नियोजन असते. अशा ग्राहकांसाठी सराफा बाजारातून दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्यासह चांदीच्या किमतीतही घसरण झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करताना ग्राहकांचे लक्ष दरांकडे लागले आहे. आता दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घट झाल्याने दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना ही चांगली संधी वाटू शकते. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ४२ हजार ४८० रुपये इतकी आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीच्या किमतीत ५ हजार रुपयांची घट झाली असून, सध्या तिचा दर २ लाख २० हजार रुपये इतका आहे. दरातील या बदलामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. कारण दागिन्यांच्या अंतिम किमतीत जीएसटी आणि घडणावळ शुल्काचाही समावेश होतो. त्यामुळे खरेदी करताना संपूर्ण खर्चाची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२४८
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,९८४
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४२,४८०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२४,८००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०६०
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०४,४८०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३०,६००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०६,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६८६
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८५,४८८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०६,८६०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६८,६००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.