Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! सुवर्ण बाजारात आज अचानक भाव कोसळले; पाहा नवीन दर

gold price today in Jalgaon : जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ₹१,००० आणि चांदीचा भाव प्रतिकिलो ₹३,००० ने कमी झाला. पाहा आजचे नवीन दर.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Jalgaon bullion market rate : जळगावच्या सुवर्ण बाजारात मागील आठवड्याच्या शेवटी सोने-चांदीचे दर खाली आल्यानंतर पुन्हा वाढले होते. परंतु, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे बाजारात खरेदीदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. आज सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम एक हजार रुपये, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो तीन हजार रुपयांची कपात झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या बाजारावर होत आहे. यामुळे सुवर्ण बाजारात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. मात्र, शेवटच्या तीन दिवसांत दरात वाढ झाल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी दर पुन्हा कमी झाले होते. दरम्यान, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने व चांदीचे दर पुन्हा घसरले असून सोने हजाराने, तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

शनिवारी (१९ सप्टेंबर) सोन्याचा भाव १ लाख ५३ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विना जीएसटी) होता. त्यात आज (२१ सप्टेंबर) एक हजार रुपयांची घसरण होऊन सोने १ लाख ५२ हजार रुपयांवर आले आहे. तर चांदी तीन हजार रुपयांनी स्वस्त झाली असून, चांदीचे भाव २ लाख ४१ हजार रुपयांवरून (प्रतिकिलो, विना जीएसटी) थेट २ लाख ३८ हजार रुपयांवर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना नेत्याची दादागिरी, अधिकाऱ्यांना थेट कार्यालयाबाहेर काढलं, 2 तास कामकाज ठप्प

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगावजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर धावत्या कारला अचानक

भिजवलेले बदाम की मनुके, वजन कमी करण्यासाठी कोणते ड्रायफ्रूट फायदेशीर?

Gen Z तरुण थेट रविंद्र चव्हाणांसमोर पोहोचले आणि... कल्याण-डोंबिवलीत अचानक काय घडलं?

ज्या बापाने बोट धरून चालायला शिकवलं, त्याच्याच अंत्यविधीसाठी मुलाला वेळ नाही; महाराष्ट्रात मन हेलावून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT