Gold Rate Today Saam tv
बिझनेस

Gold Rate: गूड न्यूज! सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण, प्रति तोळा ₹१०००० ने स्वस्त; प्रति तोळा इतक्या रुपयांवर आले; वाचा ताजे दर

Gold Rate Today Fall: सोन्याच्या दरात चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे. आज सोन्याचे दर जवळपास १० हजारांनी घसरले आहेत. सोन्यासह चांदीदेखील स्वस्त झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात मोठी घसरण

एका दिवसात सोनं १० हजारांनी स्वस्त

चांदीचे दर २० हजारांनी घसरले

सोन्याच्या दरात मागच्या दीड वर्षात जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यानंतर आता सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. मागच्याकाही दिवसांत सोन्याचे दर सातत्याने घसरताना दिसत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशीही सोन्याचे दर घसरले होते. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर आता सोन्याचे दर घसरले आहेत.

सोन्याचे दर दीड लाखांच्या खाली

जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर दीड लाखांच्या खाली आले आहे. आज जळगावात सोन्याचे दर १० हजारांनी घसरले आहेत. चांदीच्या दरात २२ हजारांची घसरण झाली आहे

जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ३९ हजार रुपये झाले आहे. तर चांदीचे दर २ लाख १६ हजारांवर पोहचले आहे. यामुळे खरेदीदारांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात २३ दिवस ३४ हजारांची घसरण तर चांदीच्या दरात ८५ हजारांची घसरण झाली आहे.

गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाली आहे, अशी माहिती जळगावातील सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. अमेरिका व इराण युद्धाचा सोन्या चांदीच्या दरावर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीमधील गुंतवणूक कच्चा तेलाबरोबर इतर ठिकाणी वळल्याने घसरण होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज जीएसटीशिवाय सोन्याचे दर १ लाख ३५ हजार रुपये झाले आहे. तर चांदीचे दर विना जीएसटी २ लाख १० हजार झाले आहेत. सोन्याच्या दरात एकाच दिवशीच चांगली घसरण झाली आहे. सोन्याचे दर असेच कमी व्हावे, अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT