Gold Price Today google
बिझनेस

Gold Rate Today : सोनं-चांदीचे दर पुन्हा बदलले! वाचा सुवर्णनगरीतला 18K, 22K आणि 24K चा आजचा भाव

Gold Market Rate : दिवाळीत सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत बदल झाला आहे.

Sakshi Sunil Jadhav

संजय महाजन जळगाव, साम प्रतिनिधी

दिवाळी आणि दिपोत्सवाच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदीला विशेष महत्त्व असतं. पण यंदा सणासुदीच्या दिवसातच सोन्या-चांदीच्या दरात गेले काही दिवस चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काही दिवसांआधी सोनं-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ झाली. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

सोन्याच्या दरात दीड हजारांची वाढ

जळगावच्या सराफा बाजारात सोमवारी ९ नोव्हेंबर सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली. रविवारी ८ नोव्हेंबर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम लाख ४२ हजार रुपये होता. मात्र सोमवारी त्यात १५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर आता १ लाख ४३ हजार ५०० रुपयांवर पोहोचला आहे. हे दर जीएसटीशिवाय आहेत.

चांदीही झाली महाग

सोन्याबरोबर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली. रविवारी चांदीचा दर प्रति किलो १ लाख ८८ हजार रुपये होता. सोमवारी त्यात तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव आता १ लाख ९१ हजार रुपये प्रति किलो झाला.

१८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा १ तोळ्याचा भाव किती?

२४ कॅरेट सोन्याचा भाव - १,४३,५००

२२ कॅरेट सोन्याचा भाव - १,३१,५४२

१८ कॅरेट सोन्याचा भाव - १,०७,६२५

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली होती. यामुळे खरेदीदारांना चांगला दिलासा मिळाला होता. मात्र, सण उत्‍सवाच्‍या काळातच भाववाढ होत असल्याने खरेदीच्या गणीत गडबडले होते. तरी देखील जळगावच्‍या सराफ बाजारात सोने– चांदीच्‍या खरेदीतून मोठी उलाढाल झाली आहे. दरम्‍यान आंतरराष्‍ट्रीय बाजारात होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सुवर्ण बाजारात दिसून येत असून सलग भाववाढ दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भिलपुरी गावात दाखल; शेतकरी कुटुंबासोबत साजरी करणार दिवाळी

Why Do People Talk In Sleep: झोपेत बोलण्याची सवय का लागते?

Tomato Benefits For Skin: इंस्टंट ग्लोसाठी चेहऱ्यावर लावा 'हा' टॉमेटॉ पेस्ट, काळे डाग आणि ब्लॅकहेड्स होतील कमी

Yavatmal Earthquake: ऐन दुपारी जमीन हादरली, घरांच्या भिंती थरथरल्या! भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांची धावपळ

Diwali Padwa Gift For Wife: दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोसाठी खरेदी करा लेटेस्ट डिझाईन्सच्या साड्या, 5 न्यू पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT