Gold Rate Today 4th april Saam TV
बिझनेस

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Price Today: एकाच दिवसात जवळपास ४०,००० रुपयांनी घसरल्यानंतर भारतात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आजचा २४ कॅरेट (24K), २२ कॅरेट (22K) आणि १८ कॅरेट (18K) या सर्व प्रकारच्या सोन्याचे दर किती जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Gold Price Today: लग्नसराईच्या काळात सराफ बाजारात सोनं घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे यावेळी सतत सोन्याचे दर बदलू लागल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे.मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. मात्र या आठवड्यात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. आजचा २४ कॅरेट (24K), २२ कॅरेट (22K) आणि १८ कॅरेट (18K) या सर्व प्रकारच्या सोन्याचे दर किती जाणून घेऊयात.

२४ कॅरेट सोन्याचा दर (24K Gold Rate)

ताज्या व्यवहाराच्या सत्रानुसार, १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १९६ रुपयांनी वाढून १५,०९३ रुपयांवर पोहोचला आहे; यापूर्वी हा भाव १४,८९७ रुपये होता. ८ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,२०,७४४ रुपये झाला असून, यात १,५६८ रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा दर वाढून १,५०,९३० रुपयांवर पोहोचला आहे.

२२ कॅरेट सोन्याचा दर (22K Gold Rate)

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १८० रुपयांनी वाढून १३,८३५ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी हा दर १३,६५५ रुपये होता. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आता १,१०,६८० रुपये इतका झाला आहे. यात १,०९,२४० रुपयांवरून १,४४० रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅमचा दर वाढून १,३८,३५० रुपयांवर पोहोचला आहे. जो १,३६,५५० रुपयांच्या तुलनेत १,८०० रुपयांनी अधिक आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Rate)

१ ग्रॅम १८ कॅरेट सोन्याचा दर ११,१७३ रुपयांवरून १४७ रुपयांनी वाढून ११,३२० रुपये झाला आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव आता ९०,५६० रुपये इतका झाला असून, यात ८९,३८४ रुपयांवरून १,१७६ रुपयांची वाढ झाली आहे. १० ग्रॅमचा दरात १,४७० रुपयांची वाढ झाली असून १,११,७३० रुपयांवरुन आता हा दर १,१३,२०० रुपये इतका झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार; ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन

Maharashtra Live News Update : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या 40 फूट उंच होर्डिंग चे लोकार्पण

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT