दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारपेठांमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. सणासुदीच्या काळात नवीन दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सराफा बाजारातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशातच दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत घट झाल्याने खरेदीदारांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरली आहे.
आजच्या ताज्या आकडेवाडीनुसार, १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४२ हजार २६० रुपये इतका आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १ हजार ६९० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या किमतीत तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली असून, सध्या चांदीचा दर २ लाख १० हजार रुपये इतका आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरातील या घसरणीचा ग्राहकांना फायदा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफा बाजारातील दर आणि दागिन्यांचे घडणावळ शुल्क तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२२६
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१३,८०८
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,४२,२६०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १४,२२,६००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०४०
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०४,३२०
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,३०,४००
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १३,०४,०००
१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६६९
८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ८५,३५२
१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०६,६९०
१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १०,६६,९००
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.