Gold Rate Today  AI image
बिझनेस

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्याचे भाव धडाधड कोसळले! प्रतितोळा १३१० रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर

Gold rate today after Diwali : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा १,३१० रुपयांनी कमी होऊन १,३८,४९० रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १,२६,९५० रुपये, तर १८ कॅरेटचा दर १,०३,८७० रुपये झाला आहे.

Namdeo Kumbhar

Gold rate today after Diwali : दिवाळीचा सण संपताच सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किमतीत सर्वात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा १३१० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव गडगडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा (१० ग्रॅम) तब्बल १,३१० रुपयांची घसरण झाली असून, सोन्याचा दर १,३८,४९० रुपयांवर आला आहे. तर दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा १,२०० रुपयांनी कमी होऊन १,२६,९५० रुपये इतका झाला आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रतितोळा ९८० रुपयांची घट होऊन दर १,०३,८७० रुपयांवर पोहोचले आहेत.

दिवाळीत सोन्याचे दर गगनाला भिडल्याने अनेकांनी खरेदी पुढे ढकलली होती. मात्र, आता दरात मोठी घट झाल्यामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोन्याची किंमत किती? (goodreturns)

२४ कॅरेट सोने: ₹१,३८,४९० (₹१,३१० ने घसरण)

२२ कॅरेट सोने: ₹१,२६,९५० (₹१,२०० ने घसरण)

१८ कॅरेट सोने: ₹१,०३,८७० (₹९८० ने घसरण)

दसऱ्यानंतर सोन्याच्या दरात अचानक वाढ नोंदण्यात आली होती. दिवाळीतही सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्ध, कच्चा तेलाच्या किंमतीचा परिणाम सोन्यावर होतो. गेल्या काही दिवसांपासून युद्धाची चिन्हे निवळल्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. पण भविष्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज तज्तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

चांदीचे दरही घसरले -

सोन्यासोबतच आज चांदीच्या दरातही किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. गुरूवारच्या तुलनेत आज चांदीचा दर प्रतिकिलो १०० रुपयांनी कमी होऊन १,९९,९०० रुपयांवर आला आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीच्या दरात १ रुपयाची घट होऊन ती १,९९९ रुपयांना मिळत आहे, तर १०० ग्रॅम चांदीसाठी आज १९,९९० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच १ ग्रॅम चांदीचा दर १९९.९० रुपये आणि ८ ग्रॅमचा दर १,५९९.२० रुपये इतका नोंदवला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात; नागपूरमध्ये खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी

Andheri Gas Cylinder Blast: अंधेरीत गॅस सिलिंडरचा स्फोट, आगीच्या भडक्यात दोन महिलासह १३ वर्षीय मुलगी भाजली

Accident: भयंकर अपघात! ७०० मीटर खोल दरीत कोसळली व्हॅन; १४ जणांचा जागीच मृत्यू

Son Papdi Recipes : दिवाळीत भरपूर सोनपापडी मिळालीये? फेकून देण्याऐवजी बनवा 'या' ५ भन्नाट रेसिपी!

SCROLL FOR NEXT