दिवाळी संपताच लग्नसाईला सुरुवात होते. लग्न म्हटलं की दाग-दागिन्यांची खरेदी असतेच. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. फक्त १० दिवसांत सोन्याचे दर हजारो रुपयांनी कमी झाले. महत्त्वाचं म्हणजे, चांदीच्या दरातही तब्बल १५ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला. आज १५ नोव्हेंबर रोजी सोनं-चांदीचे दर स्थिर आहेत. मग मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? हे जाणून घेऊयात.
गेल्या १० दिवसांत सोनं मोठ्या संख्येने स्वस्त झालं. २४ कॅरेट १० ग्रॅमची सोनं ८,६६० रुपयांनी स्वस्त झालं. तर २२ कॅरेट ७,९५० रुपयांनी घसरलं आहे. १० ते १३ नोव्हेंबरच्या दरम्यान सलग चार दिवस सोन्याच्या दरात ही घसरण झाली.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३७ हजार ६२० रुपये
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख २६ हजार १५० रुपये
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३ हजार २२० रुपये
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३७ हजार ७७० रुपये
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख २६ हजार ३०० रुपये
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३ हजार ३७० रुपये
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३७ हजार ६२० रुपये
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख २६ हजार १५० रुपये
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३ हजार २२० रुपये
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३७ हजार ६२० रुपये
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख २६ हजार १५० रुपये
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १ लाख ३ हजार ३०० रुपये
सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही मोठी घसरण झाली. गेल्या १० दिवसात एक किलो चांदी तब्बल १५ हजार रुपयांनी स्वस्त झाली. ६, ११ आणि १३ नोव्हेंबर रोजी प्रत्येक वेळी चांदीच्या किंमतीत ५ हजार रुपयांची घसरण झाली. सध्या मुंबई, चेन्नई आणि दिल्ली या शहरांमध्ये एक किलो चांदीचा भाव १ लाख ९५ हजार रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.