Gold Rate Hike 2024, Gold Price Hike Reason Saam Tv
बिझनेस

Gold Rate Hike 2024 : गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७२ हजारांवर? खरेदीसाठी मागणीत वाढ सुरुच; कारण काय?

Gold Price Hike Reason : गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याचे भाव ७२ हजारांवर पोहोचेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Why Is Gold Price Increasing In India :

मागच्या वर्षी दिवाळीत सोन्याचे भाव नरमले होते. परंतु, डिसेंबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या भावाने उच्चांक पातळी गाठली. नवे वर्ष सुरु झाल्यापासून सोन्याच्या भावात पहिले दोन महिने पतझड पाहायला मिळाली.

मार्च महिना सुरु होताच सोन्याचे (Gold) भाव गगनाला भिडले आहेत. पहिले १५ दिवस सोन्याचा चढता आलेख पाहायला मिळाला. तर महिन्याच्या अखेरी पुन्हा भावात वाढ झालेली पाहायला मिळाली.

एप्रिल महिना सुरु झाल्यापासून सलग चार दिवस सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. पहिल्यांदा सोन्याने इतकी मोठी उसळी घेतली आहे. लग्नसराईचा काळ असल्यामुळे धातुच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना अधिक पैसे (Price) मोजावे लागणार आहे. अशातच सोन्याच्या भाव वाढ असला तरी खरेदीदारांच्या मागणीत वाढही पाहायला मिळाली. गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याचे भाव ७२ हजारांवर पोहोचेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे लग्नसराईच्या (Marriage) काळात खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

1. का वाढताय सोन्याचे भाव?

वर्ल्ड गोल्डच्या रिपोर्टनुसार २०२४ मध्ये राजकीय तणाव, सेंट्रल बँकांद्वारे सोने खरेदी आणि मंदीमुळे सोन्याच्या भावात पुन्हा झळाळी पाहायला मिळू शकते. तसेच जागतिक भू राजकीय परिस्थिती, अमेरिकेत्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर कपातीचे संकेत यामुळे सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे.

2. वर्षभरात १० हजार रुपयांनी वाढ

मागच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस भारतात सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ६१ हजार रुपयांच्या पातळीच्या जवळपास होते. वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ६६ हजारांवर पोहोचला होता. जागतिक पातळीवर मध्यवर्ती बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात सुरु असलेली खरेदी ही सोन्यातील तेजीला इंधन पुरवत असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT