बिझनेस

Gold Rate: ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार, एप्रिलमध्ये सोन्याचे दर १ लाखांपर्यंत घसरणार? वाचा सविस्तर

Gold Rate Fall: सोन्याचे दर सतत घसरताना दिसत आहे. भविष्यातदेखील सोन्याचे दर घसरतील, असं सांगण्यात येत आहे. जर इराण-इस्त्रायल युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर सोन्याचे दर घसरु शकतात.

Siddhi Hande

सोने-चांदीचे दर घसरणार?

सोन्याच्या दरात १ लाखांची घसरण होणार?

भविष्यात सोन्याचे दर अस्थिर असण्याची शक्यता

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत.या काळात सोनं खरेदीवर जास्त भर दिला जातो. लग्नघरात जास्त सोने खरेदी केली जाते. दरम्यान, आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचे दर घसरताना दिसत आहे. इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम हा सोन्यावर होताना दिसत आहे. युद्धामुळे सोन्याचे दर मात्र घसरत आहेत. सोन्यासोबतच चांदीचेही दर घसरत आहेत. दरम्यान, सोन्याचे दर १ लाखांनी घसरणार का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. मात्र, हे दर अस्थिर असण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण

मागच्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास ११ टक्क्यांनी घसरले. १९८३ नंतर सोन्याच्या दरात एका आठवड्यात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. जवळपास सलग आठ दिवस सोन्याचे दर घसरले आहे. चांदीचेही दर ३ टक्क्यांनी घसरले आहे. चांदीची किंमत ६७.५ डॉलर प्रति औंसवर आहे. आता सोन्याचे दर अजून घसरणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

सोन्याच्या दरात पुढील काही कालावधीसाठी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. इराण-इस्त्रायल युद्धामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे जागतिक पातळीवरदेखील परिणाम होऊ शकतो. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढू शकतात. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे दिसत आहे.

जानेवारीत सोन्याचे दर सर्वाधिक वाढले होते. हे दर ५,९५ डॉलरवर होते. यानंतर सध्या हे दर २२ टक्क्यांनी घसरले आहेत. एप्रिल महिन्यातदेखील सोन्याच्या दरात अस्थिरता असणार आहे. सध्या सोन्याचे दर ४,३५० ते ४,४०० डॉलरवर आहे. काही दिवसांआधी हे दर अजून घसरले होते.

सीएनबीसीच्या अॅनालिस्टनुसार, सोने-चांदीच्या दरात वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात वोलैटिलिटी जारी करणार आहे. त्यामुळे दरामध्ये चढ-उतार होऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढचे पाच दिवस इराणच्या ऊर्जा केंद्रावर हल्ला न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सोन्याचे दर घसरु शकतात.

सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढताना दिसत आहे. इकोनॉमिक टाईम्सनुसार, वर्ल्ड गोल्ड काउंसिलचे सिनीयिर स्ट्रॅटेजिस्ट जॉन रीड आंनी सांगितले की, सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे. २०२६ मध्ये स्टॅगप्लेशन ट्रेड सुरु होऊ शकतात. यामुळे सध्या तर भाव वाढण्याची शक्यता आहे.

भारतात सोन्याचे दर हे रुपया आणि डॉलरवर निर्भर आहेत. सध्या सोन्याचे दर १,४०,००० रुपयांच्या घरात आहेत.सोन्याचे दर आणखी कमी होऊ शकतात. एकीकडे युद्धामुळे तेलात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे आपोआप सोन्याचे दर घसरत आहेत. सोन्याच्या दरात २.५ टक्यांनी घसरण होऊन ४,३७७ डॉलर प्रति ओंसवर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT