Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, ८००० रुपयांनी महागलं; १० तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Rate Hike: आज सोन्याच्या दरात भरघोस वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ८८०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना मात्र निराशा झाली आहे. अनेक दिवसांपासून सोन्याच्या भावात घट होत होती. परंतु कालपासून पुन्हा भाव वाढले आहेत. आज सोन्याचे भाव ८८० रुपये प्रति तोळा वाढले आहे. (Gold Rate Hike Today)

आता सणासुदीचे दिवस सुरु होतील. सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने खऱेदी करतात. शूभमूहूर्तावर सोने खरेदी केलेले चांगले असते, असं म्हणतात. दरम्यान, आता सोन्याचे दर वाढले आहे. सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसणार आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate)

गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट (24K Gold Rate) सोने प्रति तोळा ९९,२८० रुपयांवर विकले जात आहे. या दरात ८८० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ७०४ रुपयांनी वाढ झाली आहे. हे दर ७९,४२४ वर गेले आहेत. १०० तोळा सोन्याच्या दरात ८,८०० रुपयांनी वाढ झाली आहे.

आज २२ कॅरेट (22k Gold Rate) सोन्याच्या दरातही ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे ही वाढ झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याचे दर ९१,००० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,८०० रुपये आहे. १० तोळा सोन्याचे दर ८००० रुपयांनी वाढले आहेत.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही ६६० रुपयांनी वाढ झाली आहे. एक तोळा सोन्याचे दर ७४,४६० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५९,५६८ रुपये आहे.

सोन्याच्या भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेकांना सोने खरेदी करायचे की नाही हा प्रश्न पडत आहे. सोनं ही एक गुंतवणूक आहे. तुम्हाला भविष्यात या सोन्याचा खूप फायदा होणार आहे. कारण सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढी विरोधात विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलन

IAS Mittali Sethi: कोण आहेत नंदुरबारच्या IAS मिताली सेठी? दोन्ही मुलांचे घेतलेय सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन

SCROLL FOR NEXT