Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: सणासुदीच्या आधी सोन्याला झळाळी! २४ तासात तब्बल इतक्या रुपयांवर पोहचलं; वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Gold Rate Today Hike: आज सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून वाढत आहेत. जळगावच्या सराफा बाजारपेठेत सोनं महागलं आहे.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात वाढ

२४ तासात सोन्याचे दर २००० रुपयांनी वाढले

आजचे सोन्याचे दर किती?

सोन्याच्या दरात सातत्याने बदल होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहे. मध्यंतरी सोन्याचे दर १ लाख ४० हजारांवर गेले होते. त्यानंतर मात्र, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजदेखील सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.

जळगावातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आगे. गेल्या २४ तासात सोन्याचे दर २ रुपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरात ४००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today Hike)

आजचे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५७ हजार ५९० रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलोमागे २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर पोहचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे.

१९ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण सोन्याचे एखादी वस्तू घेतात. मात्र, सततच्या भाववाढीमुळे यंदा सोने खरेदीकडे पाठ फिरवतील, असं दिसत आहे.

सोन्याचे दर का वाढले? (Why Gold Price Increase)

जागतिक पातळीवर सुरु असलेल्या घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम होत आहे. अमेरिका इराणच्या संभाव्य चर्चांमुळे डॉलरची किंमत घसरली आहे. सोने जागतिक बाजारात स्वस्त होत आहे, त्यामुळे मागणी वाढून दरात वाढ होते. याचसोबत सणासुदीमुळे मागणी वाढत असल्याचे सोन्याचे दरदेखील वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Persian cat lifespan: पर्शियन मांजरी किती वर्ष जगतात?

Sahar Shaikh: कैसे बोगस दाखला बनाया? MIM च्या सहर शेखकडून दिशाभूल, नगरसेवकपद धोक्यात

Maharashtra News Live Update: जळगावचा पारा ४२.६ अंशां पेशा अधिक, दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

Akola Tourism: उकाडा वाढलाय! अकोल्याजवळ असलेल्या 'या' थंड हवेच्या ठिकाणी फिरण्याचा प्लान बनवाच

बीडमध्ये गुंडांचा हैदोस! तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, कुटुंबाचा थेट आत्महत्येचा इशारा

SCROLL FOR NEXT