Gold And Silver Rates Saam Tv News
बिझनेस

सोन्याच्या दराला चकाकी; २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? वाचा आजचे लेटेस्ट दर

Gold and Silver Rates: आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹220 ची वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोनं १० ग्रॅमसाठी ₹94,000 ला विकलं जात आहे.

Bhagyashree Kamble

  • आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹220 ची वाढ झाली आहे.

  • २२ कॅरेट सोनं १० ग्रॅमसाठी ₹94,000 ला विकलं जात आहे.

  • १८ कॅरेट सोन्याचाही दर वाढला असून १० तोळ्यांचा दर ₹7.69 लाख झाला आहे.

  • चांदी १ किलोसाठी ₹1,17,000 ला मिळत आहे, दरात ₹1000 वाढ झाली आहे.

सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २२० रूपयांची वाढ झाली आहे. तर, १०० ग्रॅम सोन्याच्या दरात २,२०० रूपयांची वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. लवकरच सणवार सुरू होतील. जर आपणही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आजचा सोन्याचा दर जाणून घ्या.

गुड रिटर्न्स या वेबसाईटनुसार, सोन्याच्या दरात आज तेजी पाहायला मिळत आहे. भारतात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २२० रूपयांची वाढ झाली आहे. १ तोळं सोनं खरेदीसाठी १,०२,५५० मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरातही २२०० रूपयांची वाढ झाली आहे. १० तोळं सोन्याचा दर १०,२५,५०० इतका आहे.

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असल्याचं चित्र आहे. भारतात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात २०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ९४,००० इतका आहे. तर, २२ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात २००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,४०,००० रूपये मोजावे लागतील.

तसेच १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात १६० रूपयांची वाढ झाली आहे. तसेच १० तोळं सोन्याच्या दरातही १,६०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ७६,९१० रूपये मोजावे लागतील. तसेच १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ७,६९,१०० रुपये मोजावे लागतील.

भारतात चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचा दर १ रूपयांनी महागला आहे. तर, १ किलो चांदीचा दर १००० रूपयांनी महागला आहे. १ किलो चांदीसाठी आपल्याला १,१७,००० मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

SCROLL FOR NEXT