GOLD PRICE RISE WHY IS GOLD GETTING EXPENSIVE WILL GOLD CROSS ₹3 LAKH saam tv
बिझनेस

Gold Prices: सोनं का महागतंय? सोनं 3 लाखांच्या पार जाणार?

GOLD PRICE RISE: देशांतर्गत बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किमतींनी सर्वसामान्यांना घाम फोडलाय. सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरात तुफान वाढ झालीये. मात्र, सोनं दिवसेंदिवस का महागतंय?. यामागची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.

Rohit Kadam

  • देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ होत आहे.

  • सोन्याच्या दरवाढीमागे जागतिक बाजार, मागणी आणि आर्थिक अनिश्चितता

  • आंतरराष्ट्रीय सोन्याचा भाव आणि डॉलर-रुपया विनिमय दराचा भारतीय बाजारावर परिणाम होतो.

गेल्या आठवड्याभरात सोने-चांदीच्या दरात झालेली वाढ पाहून सर्वसामान्य नागरिक अवाक् झालेत. जागतिक बाजारात देखील सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळतेय. एव्हंढच नाही तर सोने-चांदीच्या दरातील उसळी दिसून आल्यानं ग्राहकांना धक्का बसलाय. सोन्याच्या दर 1 लाख 62 हजार रुपये प्रतितोळा पोहोचलेत. तर चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल 10 हजारांची वाढ झालीये. इतकंच नव्हे तर सोने 3 लाख रुपये तोळ्यावर जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीत किती वाढ झालीये ते पाहूयात.

20 ऑगस्ट

सोने

वाढ - 4500

भाव - 1,56,000

चांदी

वाढ - 11,000

भाव - 2,40,000

21 ऑगस्ट

सोने

वाढ - 2500

भाव - 1,58,500

चांदी

वाढ - 8000

भाव - 2,48,000

मात्र, सोने-चांदी दरात इतकी वाढ नेमकी कशामुळे होतेय?.. ते जाणून घेऊयात. अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे सोन्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचलेत. तर दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर कमोडिटी बाजारातही अस्थिरता निर्माण झालीये. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी झालेली घसघशीत वाढ पाहता सोने-चांदी खरेदी करावी का?, असा प्रश्न नागरिकांना पडलाय. एव्हंढच नाही तर जागतिक बाजारातील अस्थिरता पाहता, पुढील काळात सोनं 3 लाखांच्या पार जाणार का? याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT