Today’s gold rate  Saam TV Marathi News
बिझनेस

Gold Rate: सोनं खरेदी करावं की नाही? प्रति तोळा १ लाखांच्या पुढे; जाणून घ्या आजचे दर..

Gold Price Today: इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतात सोन्याचे दर १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले आहेत. चांदीही १.१० लाख रुपये किलो झाली असून दरवाढीने खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

इराण इस्त्रायल युद्धामुळे सोन्याच्या दरात तेजीने वाढ होत आहे. सोन्याच्या दराने काही महिन्यांतच उच्चांकी गाठली. १६ जून २०२५ रोजी सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १,०१,६०० रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ मागील दोन महिन्यांतील उच्चांकी पातळी मानली जात आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत सोने १,५०० रूपयांनी महाग झाले आहे.

सोमवार १६ जून रोजी सोन्याचे दर वाढले. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचे दर ९३,२०० रूपये तर, २४ कॅरेट सोनं १,०१,६६० रूपये प्रति १० ग्रॅमने सराफा बाजारात विकला जात आहे. मुंबईतही २२ कॅरेट सोन्याचा दर ९६,०५० रूपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १,०१,५१० रूपये इतका आहे. पटना लखनऊ, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये सोन्याचा दर इतकाच आहे.

चांदीची किंमत किती?

आज १६ जून २०२५ रोजी चांदीचा भाव १,०९,९०० रूपये प्रति किलो आहे. गेल्या शुक्रवारच्या तुलनेत चांदीच्या किमतीत सुमारे १००० रूपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत चांदीची किंमत १,२०,००० रूपयांपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

देशात दर कसे ठरवले जातात?

सोन्याच्या दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकीय अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, आणि देशांतर्गत वाढलेली मागणी. भारतात सण-उत्सवांच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. परिणामी, सराफा बाजारात दर झपाट्याने वाढत आहेत. परंतु भारतात सोने हे केवळ पैसे कमविण्याचा मार्ग नाही तर, ते आपल्या परंपरेचा देखील एक भाग आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जास्त सोनं खरेदी करत असतो. जेव्हा त्याची मागणी वाढते, त्याच्या किमतीही वाढतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घसरण, २४ कॅरेट सोन्याचा भाव किती? पाहा लेटेस्ट दर

क्रिकेट विश्वावर शोककळा, ऑस्ट्रोलियाला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूचं निधन

Jai Jawan Govinda Pathak: नऊ थरांनंतर आता दहा थरांचा विक्रम घडवण्यासाठी जय जवान पथक सज्ज|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डिसीपीच्या गाडीलाच ठोकलं

Javed Akhtar: 'तुझ्या पूर्वजांनी ब्रिटिशांचे बूट चाटले...'; 'पाकिस्तानी' म्हटल्याने जावेद अख्तर भडकले, ट्रोलरची केली बोलती बंद

SCROLL FOR NEXT