Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सुवर्णसंधी! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; एक तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Price Today: सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जाणून घेऊया मंगळवारी देशभरात सोन्याचा भाव काय आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नाचे दिवस सुरु असून सर्वांचं लक्ष सोने तसंच चांदीच्या भावाकडे असतं. अशातच आज म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्याऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. जाणून घेऊया मंगळवारी देशभरात सोन्याचा भाव काय आहे.

मनी कंट्रोलच्या बेवसाईटनुसार, मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅमची घट पहायला मिळाली आहे. दिल्ली, मुंबई, पटना, जयपूर, लखनऊ या मोठ्या शहरांमध्ये सोने 300 रुपयांनी स्वस्त झाल्याची माहिती आहे.

यावेळी 24 कॅरेट सोन्याचा दर 78,700 रुपयांच्या वर आहे. याचसोबत 22 कॅरेट सोन्याचा दर 72,100 रुपयांच्या वर आहे. सोन्याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, भविष्यात सोन्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.

चांदीच्या दरात देखील घट?

आजच्या दिवशी चांदीच्या दरात देखील घट पाहायला मिळालीये. देशात एक किलो चांदीची किंमत 91,500 रुपये आहे. सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरात 500 रुपयांनी घट झाली आहे.

विविध शहरांतील १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

मुंबई

22 कॅरेट सोनं - 72,000 रुपये

24 कॅरेट सोनं - 78,550 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 72,000 रुपये

24 कॅरेट सोनं - 78,550 रुपये

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 78,700 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 78,700 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 72,150 रुपये

24 कॅरेट सोनं - 78,700 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT