Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Gold Price Drop: आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹1,100 ची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ₹91,500 मोजावे लागतील.

Bhagyashree Kamble

  • सोन्याच्या दरात सलग काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे.

  • आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ₹1,100 ची घट झाली.

  • चांदीचे दर मात्र १ लाखांहून अधिकच आहेत; आजचा दर ₹1,16,000 आहे.

  • गुंतवणूकदारांसाठी हे सोनं खरेदीसाठी योग्य वेळ असू शकतो.

गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढलेले सोन्याचे दर आता हळूहळू खाली येताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून सातत्याने सोन्याच्या दरात घट होत आहे. आजही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २९ जुलै रोजी १० तोळं सोन्याच्या दरात १,१०० रूपयांनी घसरण झाली आहे. तर, चांदीचा दर मात्र आजही ₹१,१६,००० प्रति किलोच्या आसपास टिकून आहे.

आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात १,१०० रूपयांनी घट झाली आहे. १०० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,९८,२०० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १००० रूपयांची घट झाली आहे. १०० ग्रॅम सोनं खरेदीसाठी ९,१५,००० रूपये मोजावे लागतील.

तर, १८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८०० रूपयांची घट झाली आहे. १०० ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला ७, ४८,७०० रूपये मोजावे लागतील. तर, १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८० रूपयांची घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला ७४,८७० रूपये मोजावे लागतील. तर, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ किलो चांदीचा दर १,१६,००० इतका आहे.

भारतात सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

भारतात सोन्याचे दर विविध घटकांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमती, डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क, तसेच केंद्र सरकारद्वारे आकारले जाणारे विविध कर याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होतो.

सोनं हा केवळ गुंतवणुकीचा पर्याय नसून सण-उत्सव, विवाहसोहळे आणि धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत होणारे चढ-उतार हे सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT