Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं ५९५० रुपयांनी स्वस्त; २४-२२ कॅरेटचे आजचे दर किती?

Gold - Silver Price Today: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. १ तोळा सोनं ५९५० रुपयांनी स्वस्त झालं. तर १ किलो चांदी १५००० रुपयांनी स्वस्त झाली.

Priya More

Summary -

  • सोन्याच्या दरात मोठी घसरण

  • १ तोळा ५,९५० रुपयांनी स्वस्त

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर कमी

  • चांदीच्या दरातही १५,००० रुपयांची घसरण

  • सोनं-चांदी खरेदीची ग्राहकांसाठी चांगली संधी

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५९,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ किलो चांदीच्या दरात देखील १५००० रुपयांची घसरण झाली. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे २४,२२ आणि १८ कॅरेटचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं ५९५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,४०,०२० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५९,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,००,२०० रुपये खर्च करावे लागणार आहे. २४ कॅरेटच्या सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

२२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. २२ कॅरेटचे १ तोळा सोनं ५,४५० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,२८,३५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ५४,५०० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १२,८३,५०० रुपये खर्च करावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ४,४६० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १,०५,०२० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटचे १० तोळा सोनं ४४,६०० रुपयांनी स्वस्त झालं. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला आज तुम्हाला १०,५०,२०० रुपये खर्च करावे लागतील. आज २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे तुम्ही आज सोनं खरेदी करू शकता. आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Maharashtra News Live Update: : बीडच्या माजलगाव येथील लाहमेवाडी येथे टायर जाळत रस्ता रोको आंदोलन प्रशासनाचा निषेध

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT