Gold Price Drop Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Today Gold- Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी आहे कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

Priya More

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा ५४० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना आज सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज १८, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत ते घ्या जाणून....

गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ५४० रुपयांनी घसरण होऊन ते ९८,२९० वर आले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांवर पैसे खर्च करावे लागणार आहेत. शनिवारी याच १ तोळा सोन्यासाठी तुम्हाला ९८,८३० रुपये खर्च करावा लागला होता. तर आज १० तोळा २४ कॅरेट सोन्याच्या दरात ५,४०० रुपयांनी घट झाली आहे. १० तोळा २४ कॅरेटचे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९,८२,९०० रुपये खर्च करावे लागतील.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९०,१०० रुपये खर्च करावे लागतील. तर २२ कॅरेटचे १० तोळं सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,०१,००० रुपये खर्च करावा लागेल. तर १८ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी देखील आज कमी खर्च करावा लागणार आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४१० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७३,७२० रुपये खर्च करावे लागतील. तर १८ कॅरेटच्या १० तोळे सोन्यासाठी आज ७,३७,२०० रुपये खर्च करावे लागतील.

देशात सोन्याच्या दरात घसरण जरी झाली असली तरी चांदीच्या दरात काहीच बदल झाला नाही. आज एक ग्रॅम चांदी खरेदी करण्यासाठी ११० रुपये खर्च करावे लागतील. तर एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १, १०,००० रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आज चांदीपेक्षा सोनं खरेदी करण्याकडे नागरिकांचा भर असेल अशी शक्यता सोनारांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

SCROLL FOR NEXT