Gold Price Hike Saam Tv
बिझनेस

Gold Price Hike : सोन्याचा दर नव्या उच्चांकावर पोहोचणार; अक्षय्य तृतीयेपर्यंत 1 लाख रुपयांचा टप्पा गाठणार?

Gold Price Today : जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सोन्याच्या दरात १,३०० रुपयांची वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याचे दर १ लाख रुपयांवर पोहोचतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Yash Shirke

संजय महाजन, साम टीव्ही, प्रतिनिधी

लग्नसराईच्या सोन्याच्या दरांनी नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. सोन्यासह चांदीच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. जळगावमधील सराफ बाजारात बुधवारी (१६ एप्रिल) रोजी सोन्याच्या दरात तब्बल १,३०० रुपयांची वाढ झाली असून जीएसटीसह सोन्याचे दर ९५,५०० रुपयांवर पोहोचले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने ९७ हजारांचा आकडा पार केला आहे. मागील ५ दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत यात एकूण ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक चिंतेत आहेत. याचा परिणाम सोनेखरेदीवर झाला आहे. ऐन लग्नसराईच्या काळात ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सोन्यासह चांदीच्या दरात देखील झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीचा दर ९९,३९५ रुपये (जीएसटीसह) प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदी पुन्हा एकदा १ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. चांदीची किंमत लवकरच लाखाच्या घरात जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. जळगावचे सराफ व्यावसायिक निलेश जैन यांनीही माहिती दिली आहे.

सोने-चांदीच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्रॅरिफ संदर्भातील धोरण आणि आर्थिक अनिश्चितता कारणीभूत आहे असे सराफ बाजारीतील व्यापाऱ्यांचे मत आहे. सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे आणि त्याच्या दरवाढीमुळे आगामी काळात सोन्याचे दर १ लाख रुपयांवर पोहोचतील असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT