Gold- Silver Rates Rise Again  meta ai
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोनं महागलं, १० तोळ्याच्या दरात ३२,२०० रुपयांची वाढ; वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Gold- Silver Rates Rise Again: दिवाळीत सोनं स्वस्त होण्याऐवढी महागले आहे. सोनं-चांदीच्या दरात आज आतापर्यंत सर्वात मोठी वाढ झाली आहे. आजचे दर किती ते घ्या जाणून...

Priya More
  • दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोन्याला चकाकी

  • आज २४-२२ आणि १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ

  • १ तोळा सोन्याच्या दरात ३,२२० रुपयांची वाढ

दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. दिवाळीत सोनं-चांदी स्वस्त होण्याऐवजी वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. दर वाढल्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ३,२२० रुपयांची वाढ झाली. तर १ किलो चांदीच्या दरात १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी दर किती आहेत ते वाचून जा...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४- २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२२० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,४६,०२० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२,२०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १४,६०,२०० रुपये खर्च करावे लागतील.

आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २,९५० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,३३,८५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात २९,५०० रुपयांची वाढ झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना १३,३८,५०० रुपये मोजावे लागतील.

२४ आणि २२ कॅरेट पाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील महाग झालं आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं २४२० रुपयांनी वाढले आहेत. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,०९,५२० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २४,२०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १०,९५,२०० रुपये खर्च करावे लागतील.

दरम्यान, आज सोन्यासोबत चांदीचे दर देखील वाढले आहे. आज १ ग्रॅम चांदी १० रुपयांनी महाग झाली आहे. ही चांदी २१० रुपयांना विकली जात आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये १०,००० रुपयांची वाढ झाली आहे. ही चांदी खरेदी करताना ग्राहकांना २,१०,००० रुपये खर्च करावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीत पुन्हा तणाव, शिंदेसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या वादात राहुल गांधींची उडी; भाजपवर मतांची चोरी केल्याचा आरोप

Jai Shree Ram Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? प्रविण तरडेंच्या 'जय श्री राम'मधून उलगडणार कहाणी

ACB raid: झेडपीच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं ५.१६ कोटींचं घबाड, एसीबीकडून २.५ किलो सोनं अन् ११.६ किलो चांदी जप्त

Sleep Hiccups : रात्री उचकी लागून झोपमोड होतेय? दुर्लक्ष करू नका! शरीर देतेय 'या' आजाराचे संकेत

SCROLL FOR NEXT