२४ कॅरेट सोनं १ तोळा ७६० रुपयांनी महागलं.
१० तोळा सोनं ७,६०० रुपयांनी वाढलं.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या भावातही वाढ.
चांदीचा दर मात्र १,००० रुपयांनी घसरला.
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. सर्वजण सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. पण सोन्याचे दर काही कमी होताना दिसत नाहीये. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ७६० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी जाण्यापूर्वी आजचे दर किती घ्या जाणून...
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ७६० रुपयांनी महागले असून ते खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०६,८६० रुपये मोजावे लागणार आहेत. हे सोनं गुरूवारी १,०७,६२० रुपयांनी विकले गेले. २४ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ७,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज १०,६८,६०० रुपये द्यावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये आज ७०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ९७,९५० रुपये मोजावे लागणार आहे. गुरूवारी याच सोन्याचे दर ९८,६५० रुपये इतके होते. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ७००० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ९,७९,५०० रुपये द्यावे लागणार आहेत. गुरूवारी हेच सोनं खरेदीसाठी ९,८६,५०० रुपये द्यावे लागले होते.
त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ५८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८०,१४० रुपये मोजावे लागणार आहेत. हेच सोनं गुरूवारी ८०,७२० रुपयांना विकले गेले. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ५८०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ८,०१,४०० रुपये द्यावे लागणार आहे.
तसंच, आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीचे दर १ रुपयांनी घसरले आहेत. १ ग्रॅमसाठी तुम्हाला १२६ रुपये मोजावे लागणार आहेत. १ किलो चांदीचे दर १००० रुपयांनी घसरले असून ते खरेदीसाठी तुम्हाला १,२६,००० रुपये द्यावे लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.