Gold Price Saam Tv
बिझनेस

Gold Price: ३ दिवसांत १५,३०० रुपयांनी महागलं सोनं, १ तोळा खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतील?

Gold- Silver Price: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. गेल्या ३ दिवसांत सोनं १५,३०० रुपयांनी महागले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. आज १८, २२, २४ कॅरेट सोन्याचे दर किती? वाचा सविस्तर...

Priya More

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे. सोन्याचे दर वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. भारतामध्ये १० जुले ते १२ जलै या ३ दिवसांच्या कालावधीत सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. या तीन दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १५,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ भारतात चांदीचे दर देखील वाढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लावले. त्यानंतर सोनं-चांदीचे दर सतत वाढताना दिसत आहे. ट्रम्प यांनी लावलेला नवे टॅरिफ रेट येत्या १ ऑगस्टपासून प्रभावी होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जुलै ते २० जुलै दरम्यान सोन्याच्या किमतींवर टॅरिफ, अमेरिकन व्याजदर आणि डॉलरची किंमत कमकुवत होण्याची शक्यता या सर्वांचा परिणाम होऊ शकतो. पुढील आठवड्यात सोन्याचे दर ९४,००० ते १,०२,००० या दरम्यान असू शकतात. तर चांदीचे १ किलोचे दर देखील १,०५,००० ते १,१८,००० च्या दरम्यान असू शकतात. सध्या देशात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ९,९७१ रुपये आहे. २२ कॅरेटच्या १ ग्रॅम सोन्याची किंमत ९,१४० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ७,४७९ रुपये आहे.

१२ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅम म्हणजे १० तोळा सोन्याच्या दरात ७,१०० रुपयांनी वाढ झाली होती. म्हणजे १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याच्या दरात ७१० रुपयांनी वाढ झाली होती. ११ जुलै रोजी २४ कॅरेट १० तोळा सोन्याच्या दरात ६,००० रुपयांनी वाढ झाली होती. म्हणजे १ तोळा सोन्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली होती. १० जुलै रोजी १० तोळे सोन्याच्या दरात २२०० रुपयांनी वाढ झाली होती. १ तोळा सोन्याच्या दरात २२० रुपयांनी वाढ झाली होती. म्हणजे १० ते १२ जुलैदरम्यान १० तोळा सोन्याच्या दरात १५,३०० रुपयांनी वाढ झाली आणि १ तोळा सोन्यच्या दरात १,५३० रुपयांनी वाढ झाली. तर जुलै महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या दरात १.३ टक्केपर्यंत वाढ झाली आहे.

सोन्याच्या किमतीत आज कालच्या तुलनेत कोणताही बदल झालेला नाही. मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे यासारख्या प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,९७१ रुपये आहे. २२ कॅरेटचा दर प्रति ग्रॅम ९,१४० रुपये आहे. तर आज या शहरांमध्ये १८ कॅरेट सोन्याचा दर ७,४७९ रुपये आहे. चेन्नईमध्ये आज १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ७५३० रुपये आहे. त्याचसोबत, आज मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरूमध्ये चांदीचा दर १,१५,००० रुपये प्रति किलो आहे. चेन्नई, हैदराबाद आणि केरळमध्ये चांदी महाग असून याठिकाणी १ किलो चांदी खरेदीसाठी १,२५,००० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT