Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले! १० तोळ्यांवर किती हजाराची बचत? भाऊबीजेला घ्या नवा दागिना

Gold and Silver Prices Fall Significantly: धनत्रयोदशीपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ उतारानंतर आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

Bhagyashree Kamble

  • सोन्याच्या दरात घसरण.

  • चांदीच्या भावातही घट.

  • भाऊबीज या सणानिमित्त खरेदी करा नवा दागिना.

सोने अन् चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झाली आहे. सोनं आणि चांदीच्या दरात होणाऱ्या घसरणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. धनत्रयोदशीपासून सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या दरात ८,१०० रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात झालेल्या घटमुळे निश्चितच नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

आज २३ ऑक्टोबर २०२५. सर्वत्र दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली जाणार आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ८१० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,२५,०८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ८,१०० रूपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १२,५०,८०० रूपये मोजावे लागतील.

२४ कॅरेटसह २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७५० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला १,१४,६५० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,५०० रूपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,४६,५०० रूपये मोजावे लागतील.

२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ६१० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं खरेदीसाठी आपल्याला ९३,८१० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ६,१०० रूपयांची घसरण झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ९,३८,१०० रूपये मोजावे लागतील.

सोन्यासह चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात १ ग्रॅममागे १ रूपयांची घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आपल्याला १५९रूपये मोजानवे लागतील. १किलो चांदीच्या दरात १००० रूपयांची घसरण झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,५९,००० रूपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT