Gold- Silver Price Today Saam tv
बिझनेस

Gold Price: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर

Gold- Silver Price Today: सोनं खरेदी करण्याची आज सुवर्णसंधी आहे. दोन दिवसांनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते एकदा वाचून जा...

Priya More

Summary -

  • आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली

  • २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १६० रुपयांनी घसरले

  • २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याचे दर १५० रुपयांनी घसरले

  • चांदी मात्र महागली असून १ किलो चांदी ४,००० रुपयांनी वाढली

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. पण चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होती होती. पण आज सोन्याचे दर कमी झाल्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करता येईल. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १६० रुपयांनी घसरण झाली आहे. तर १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १६० रुपयांनी कमी झाले आहेत. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२७,७५० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १,६०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,७७,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१७,१०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये तब्बल १,५०० रुपयांची घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ११,७१,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. हेच सोनं काल ११,७२,५०० रुपयांना विकले गेले होते.

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १२० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९५,८१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९,५८,१०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे आज सोनं खरेदी करताना तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.

दरम्यान, एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी १७३ रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये तब्बल ४,००० रुपयांनी वाढ झाली आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला १,७३,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज चांदी खरेदी करताना तुमच्या खिशावर ताण येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vange Batata Bhaji: लग्नाच्या पंगतीत वाढली जाणारी झणझणीत वांगा बटाटा भाजी घरी कशी बनवायची?

तळागाळातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी TEN x YOU चा पुढाकार; U-19 कर्णधार आयुष म्हात्रेसोबत केली भागीदारी

कोबीच्या शेतात सापडला तरूणीचा रक्तानं माखलेला मृतदेह; 'असं' फुटलं हत्येचं बिंग

Maharashtra Politics: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची धावत्या ट्रेनसमोर आत्महत्या; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याची माहिती

Kalyan News : महायुतीत बॅनर युद्धाचा भडका! "कोण आहे विकासाचे स्पीडब्रेकर?" भाजपची शिंदे गटावर खोचक टीका

SCROLL FOR NEXT