Gold Country Saam Tv
बिझनेस

Gold Country : सर्वाधिक सोन्याचं उत्पादन कोणत्या देशात? भारत पहिल्या ५० मध्येही नाही, वाचा सविस्तर

Gold Rate News : सोन्याच्या उत्पादनात भारताला मागे टाकत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी आहेत. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सोन्याचे उत्पादन घेतले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. सोने हे केवळ दागिन्यांपुरते मर्यादित नाही तर ते भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक भाग आहे. भारतासारख्या धार्मिक देशात कोणतही लग्न किंवा इतर विधी सोन्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच भारतात सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. भारतात दरवर्षी हजारो टन सोने खाणीतुन काढले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का जगातील एका देशात सोन्याच्या खूप मोठ्या खाणी आहेत.

अनेक लोकांचा समज आहे दुबईसारख्या आखाती देशात सोने स्वस्त असल्याने तिथे सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र हा समज चुकीचा असून भारताच्या शेजारील देश म्हणजेच चीन मध्ये सोन्याच्या मोठं मोठ्या खाणी आढळतात. चीन सोन्याच्या उत्पादनात आघाडीवर असलेला देश आहे. येथे अनेक सोन्याच्या खाणी आहेत. ज्यातून अनेक टन सोने काढले जाते.

एका अहवालानुसार, मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये चीनमध्ये ३८० टन सोने उत्पादन झाले. सोन्याच्या उत्पादनाच्या बाबतीत, चीननंतर रशिया आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये रशियामध्ये २८४ टन सोन्याचे उत्पादन झाले, तर ऑस्ट्रेलियामध्ये २०२ टन सोन्याचे उत्पादन झाले. जगात सर्वाधिक सोने उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये कॅनडा चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर या यादीत अमेरिकेचे नाव येते.

भारतात सोन्याचा वापर जास्त असूनही भारताचा सोने उत्पादनाच्या यादीत १० देशांमध्येही नाही. भारतात आजचा सोन्याचा दर ९८ हजारांवर गेला आहे. पश्चिम आशियातील शांततेनंतर एकीकडे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याची चमक सतत कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT