Gold Price Drop saam tv
बिझनेस

Gold Price Drop : आठवड्यात सोनं ₹१२,५४० स्वस्त; आताच दागिने घ्यायचे की थांबायचं? तज्ञांचा सल्ला

Gold Buying Tips : आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

Sakshi Sunil Jadhav

सोनं खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज सोन्याच्या दरात परत घसरण नोंदवण्यात आली आहे. Goodreturns ने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घट झाली, आजचा दर १,२५,०८० रुपये आहे. तर १० तोळं सोन्याच्या दरात ४९०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण आता सोनं खरेदी करावं की आणखी भाव कमी होण्याची वाट पाहावी, असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

आता सोने खरेदी करणे योग्य ठरेल का?

तज्ज्ञांच्या मते, गेल्या आठ दिवसात सोनं १२,५४० रुपयांनी स्वस्त झालं म्हणून एकाच वेळी मोठी खरेदी करणं टाळा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार असेल तर टप्प्याटप्प्याने सोनं खरेदी करण्याचा पर्याय विचारात घेता येतो. त्यामुळे एका विशिष्ट दरावर संपूर्ण गुंतवणूक करण्याचा धोका कमी होऊ शकतो. पण सोन्याच्या किंमती आणखी कमी होतील किंवा लगेच वाढतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे बाजाराचा तळ गाठण्याचा अंदाज बांधण्यापेक्षा स्वत:ची आर्थिक परिस्थिती आणि गरज लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

दागिने खरेदी करताना काय काळजी घ्याल?

दागिने खरेदी करताना फक्त सोन्याचा भाव पाहू नका. त्यासोबत घडणावळीचे दर, वेस्टेज, लागू GST आणि अंतिम बिल तपासा. हॉलमार्क आणि HUID क्रमांक असलेले दागिने निवडा. गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर Gold ETF सारखे पर्यायही समजून घ्या.

खरेदीची योग्य वेळ कोणती?

घरात लग्न किंवा अन्य कार्यक्रमासाठी सोनं महत्त्वाचं असेल, तर बजेटनुसार टप्प्याटप्प्याने खरेदी करता येईल. फक्त भाव कमी झाले म्हणून कर्ज काढून किंवा बचत संपवून सोनं खरेदी करू नका. सोन्यात गुंतवणूक करताना जोखीम आणि दीर्घकालीन उदिष्टे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोटे मोडण्याची सवय चांगली की वाईट?

Broom Cleaning Hack: झाडूच्या खालच्या भागाला अ‍ॅल्युमिनियम फॉइल का गुंडाळतात? साफ-सफाईसाठी तुम्हीही वापरा ही सोपी ट्रिक!

Maharashtra News Live Update: पाटण तालुक्यातील तारळे धरणावरील आदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

Winter Workout : सकाळ, दुपार की संध्याकाळ? हिवाळ्यात व्यायाम करण्यासाठी योग्य वेळ कोणती? शरीर राहील तंदुरुस्त

kitchen Tips : मिक्सर वापरताना या 5 चुका अजिबात करू नका, होऊ शकतो मोठा अपघात

SCROLL FOR NEXT