संजय महाजन, जळगाव
आठवडाभरापासून सोने व चांदीचे भाव सातत्याने कमी होत आहेत. या आठवड्यात देखील अशीच परिस्थिती आहे. सोने चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. आज सोने दीड हजाराने तर चांदीचे भाव तब्बल सहा हजार रुपयांनी कमी झाले आहेत. सणाच्या आधीच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पितृपक्ष नुकताच संपला असून आता नवरात्रोत्सव सुरू आहे. दरम्यान सुवर्ण बाजारात मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी भाव काहीसे वाढले होते. परंतु, पितृपक्षात होत मागणी कमी असल्याने पितृपक्ष पंधरवड्यात सोने व चांदीचे भाव कमी होत आले आहेत. दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच भावात घसरण सुरू झाली आहे. आठवड्याच्या सुरवातीला चांदीचा भाव स्थिर राहिल्यानंतर दोन दिवसांपासून यात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
चांदीच्या भावात सहा हजाराची घसरण
सोन्याचे भाव कमी झाले आहेत. मंगळवारी (ता.१३) सोन्याचा भाव एक लाख ४८ हजार रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. सुवर्ण बाजार खुला झाल्यानंतर सकाळी सोन्याचा भाव १ हजार ५०० रुपयांनी कमी झाले होते. तर चांदीच्या भावात मागील दोन दिवसात सात हजाराची घसरण झाली आहे. तर कालच्या तुलनेत आज चांदी तब्बल सहा हजार रुपयांनी कमी झाली आहे. मंगळवारी (ता.१३) दोन लाख २४ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी आज २ लाख १८ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.
काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव
१० ऑक्टोबर -
सोनं १ लाख ४९ हजार ८००
चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी) २ लाख २५ हजार
११ ऑक्टोबर -
सोनं १ लाख ४९ हजार ८००
११ ऑक्टोबर -चांदी २ लाख २५ हजार
१२ ऑक्टोबर -
सोनं १ लाख ४८ हजार ५००
चांदी २ लाख २५ हजार
१३ ऑक्टोबर.
सोनं १ लाख ४८ हजार.
चांदी २ लाख २४ हजार
१४ ऑक्टोबर
सोनं १ लाख ४६ हजार ५००
चांदी २ लाख १८ हजार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.